रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. हनुमंतराया शांतप्पा हुगार (वय ३६, रा. मुरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सकाळी सव्वा आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हुगार यांच्या रात्री एकच्या सुमारास छातीत दुखू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यां









