पावसः– श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सुवर्णा गजानन गुरव (वय ६२, रा. मावळंगे- गुरववाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिलेला २०१२ पासून ह्दयाच्या आजारावर मुंबई व येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने प्रथम पावस आरोग्य केंद्रात दाखल केले होते अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









