रत्नागिरी:- शहराजवळील टाकळेवाडी-फणसोप येथील वृद्ध महिला चुलीजवळ शेकोटी घेत असताना तोल जावून पडली. यामध्ये ती २० टक्के भाजली उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुष्पलता सदाशिव साळवी (वय ९४, रा. टाकळेवाडी, फणसोप, रत्नागिरी) असे भाजलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी पावणेपाच च्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साळवी या चुलीजवळ शेकोटी घेत होत्या चुलीवर पाणी तापविण्यासाठी पातेले ठेवलेले होते. शेकोटी घेताना वृद्ध महिलेचा तोल गेला आणि ती पडली आणि गरम पाणी तिच्या अंगावर पडले. यामध्ये त्या ३० टक्के भाजल्या. तात्काळ उपचारासाठी त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.









