Tuesday, June 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी शिरगाव-गडगेवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळले; रत्नागिरी- गणपतीपुळे मार्ग ठप्प

शिरगाव-गडगेवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळले; रत्नागिरी- गणपतीपुळे मार्ग ठप्प

रत्नागिरी:- सोमवारपासून सुरू झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात अक्षरशः दाणादाण उडवली आहे. वादळी वाऱ्यांनी अनेक भागात पडझड झाली असून मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील शिरगाव – गडगेवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळले असून यामुळे रत्नागिरी – गणपतीपुळे मार्ग ठप्प झाला. झाड बाजूला करण्याचे काम उद्धपातळीवर सुरू असून या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.