Tuesday, May 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी शिरगावच्या माजी सरपंच धनश्री सनगरे यांचे निधन

शिरगावच्या माजी सरपंच धनश्री सनगरे यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरा नजिकाच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचयातीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिरगांव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यूसमयी धनश्री यांचे वय 49 वर्षे इतके होते. अल्पशा आजारपणामुळे त्यांच्यावर कोल्हापूर येथे रूग्णालयात उपार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचे प्राणज्योत मालवली. एक मनमिळावू, हसतमुख, सुस्वभावी व्यक्तीमत्व म्हणून त्या परिचित होत्या. शिरगांव ग्रामपंचायतींचे माजी सरपंचपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले होते. आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावातील विकासकामे मार्गी लावण्यात त्याचां मोठा हातभार लाभला. आजही त्यांचे वेळोवेळी सामाजिक, राजकीय उपक्रमांत त्या कार्यरत होत्या.
धनश्री यांच्या निधनाने त्यांचा परिवार, नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिरगाव तिवंडेवाडी येथील दिपक नारायण सनगरे यांच्या त्या पत्नी आहेत. धनश्री यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे. मंगळवार 8 जुलै रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शिरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी नातेवाईक, गावातील ग्रामस्थ, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींचे बहुसंख्येने उपस्थिती होती.