विष प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- भरणे नाका (ता. खेड) येथे विष प्राशन करुन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मणीराम थापा (वय ५०, रा. भरणे, ता. खेड) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मणीराम थापा (पुर्ण नाव गाव समजून येत नाही) हे विष प्राशन केल्याने बेशुद्ध अवस्थेत भरणे नाका येथे सापडले. त्यांना उपचारासाठी कळंबणी येथे रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी गुरुवारी (ता. ११) रात्री अडीचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असताना सकाळी पावणे आठच्या सुमारास त्यांचा मृ्त्यू झाला. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.