वाहन नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता आरटीओच्या तीन कर्मचाऱ्यांना भोवली

रत्नागिरी:-वाहन नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता आरटीओ विभागातील तिघा कर्मचाऱ्यांना भोवली आहे.  रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांचा कर न भरता इतर विभागातून बॅकलॉग एन्ट्री करून वाहनांचे कर व शुल्क भरणा करून न घेता वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर परिवहन आयुक्तांनी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामध्ये वरिष्ठ लिपिक प्रशांत भोसले, कनिष्ठ लिपिक वंदिता पांचाळ आणि सुरेश मालगुंडकर यांचा समावेश आहे.