रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथील विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिशा अनिल गोरे (३३, रा. वरचे वरवडे, रत्नागिरी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता.११) रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिशाचे गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक संतूलन बिघडलेले होते. मंगळवारी ती आणि तिचा दहा वर्षांचा मुलगा असे दोघच घरात होती. अनिशाने राहत्या घराच्या भालाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. दूपारी तिचा पती अनिल दत्ताराम गोरे घरी आला असता त्याला पत्नी अनिशा हि गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने तातडीने याबाबत जयगड पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणी साठी रुग्णालयात पाठवला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









