तीन जण गंभीर जखमी
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोटे एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. कंपनीमध्ये रिएक्टरमध्ये स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या स्फोटामध्ये १० कामगार भाजले आहे. तर ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसीमध्ये दुपाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. लोटे एमआयडीसीमध्ये असलेल्या डॉक्टर खान केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला. हा स्फोट रिएक्टरमध्ये झाला. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी दुपाराच्या पाळीमध्ये काही कर्मचारी कंपनीत होते. या स्फोटामध्ये १० कामगार भाजले आहे.
अचानक स्फोट झाल्यामुळे कंपनीमध्ये एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दल आणि रग्णवाहिकांना देण्यात आली आहे. कंपनीतील दहा कामगार गंभीरित्या भाजले आहेत. त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे, सर्व जखमींना तातडीने नजीकच्याच परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. कंपनीमध्ये रिएक्टरमध्ये स्फोट कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकलं नाही. कंपनीमध्ये बचावकार्य सुरू आहे.









