रत्नागिरी:- रोटरी क्लबचा 116 वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. 116 व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे शिवाजी हायस्कुल झाडगाव रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. रोटरी क्लबचा 116 वा वर्धापन नुकताच साजरा करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या स्वरूपात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिन साजरा करताना रोटरी क्लबकडूने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील शिवाजी हायस्कुल येथील शाळेत विद्यार्थांना गणवेश वाटप केले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाऊन चे सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.









