रेल्वेच्या कुवारबाव ब्रीज जवळ सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या दिवा पॅसेंन्जरची धडक लागून अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुवारबाव ब्रिज येथे आढळला. ही घटना शनिवारी (ता. १७) चारच्या पुर्वी कुवारबाव ब्रिज येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनोळखी पुरुषाला दिवा पॅसेनजरची धडक बसून त्याच्या शरीराचे दोन भाग होऊन मयत स्थितीत आढलला. त्याचे अंदाजे वय ३५ ते ४० आहे. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.