Tuesday, May 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी राजिवडा येथे अल्पवयीन मुलीची घरात गळफास घेत आत्महत्या

राजिवडा येथे अल्पवयीन मुलीची घरात गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील राजिवडा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रहात्या घरात वाशाला ओढणीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

अर्चना दिपक बोन्द्रे (वय १६, रा. राजीवडा-टेक्निकल हायस्कूल जवळ भाड्याने, रत्नागिरी) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन अर्चना बोंद्रे हीने कोणत्यातरी अज्ञात कारणातून घरातील वाशाला ओढणीने गळफास घेतला. ही बाब तिच्या बहिणीच्या लक्षात येताच तात्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.