Wednesday, August 26, 2026
spot_img
Home राजापूर राजापूर मधीलवाडा येथून ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता

राजापूर मधीलवाडा येथून ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता

पाचल:- राजापूर तालुक्यातील मधीलवाडा परिसरात राहणारे कलामउददीन दाऊद वाडकर (वय ७५) हे २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले असून ते बेपत्ता झाले आहेत। नातेवाईकांनी सर्वत्र आणि परिसरात शोध घेऊनही ते मिळून न आल्याने याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात नापत्ता नोंद करण्यात आली आहे.

बेपत्ता कलामउददीन वाडकर यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे: वय ७५ वर्षे, रंग गोरा, उंची ५ फूट ५ इंच, डोळे काळे, केस व दाढी पांढरी असून त्यांच्या कंबरेच्या डाव्या बाजूस शस्त्रक्रिया (ऑपरेशन) केलेल्या ठिकाणी टाके आहेत। घराबाहेर पडताना त्यांच्या अंगात निळ्या उभ्या रेषा असलेला पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी (ग्रे) रंगाची फुल पँट होती। तसेच त्यांच्या उजव्या हातात स्टीलची काठी, निळ्या रंगाची पिशवी आणि काळी छत्री होती.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे करत आहेत। सदर वर्णनाची व्यक्ती कोणासही दिसून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ राजापूर पोलीस ठाण्याच्या ०२३५३-२२२०३३ / २३२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा तपास अधिकारी सपोनि सागर खंडागळे यांच्या ९२७०३६३३२८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राजापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे