राजापूर नगराध्यक्षपदासाठी आज एकच अर्ज दाखल

अपक्ष ज्योती खटावकर मैदानात

राजापूर:- राजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे. हा अर्ज अपक्ष उमेदवार ज्योती सुनील खटावकर (हिंदू महासभा) यांच्या वतीने सादर करण्यात आला आहे.

निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी कोणताही अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र, दुसऱ्या दिवशी केवळ नगराध्यक्षपदासाठीच एक अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

राजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या पदासाठी आजअखेर एकमेव अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.