राजापूर:-राजापूर तालुक्यात अपघातांची मालिका दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. भरधाव दुचाकी म्हशीवर आदळली या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
माडबन येथील संकेत गवाणकर आणि गणेश वाघधरे हे युवक जैतापुरकडून माडबनच्या दिशेने जात असताना दळे येथे काळोखात म्हैस न दिसल्याने दुचाकीस्वाराने म्हशीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, यातच दुचाकीस्वार गणेश वाघधरे याचा जागीच मृत्यू झाला. तर म्हशीचा पाय मोडला. म्हैस गडाबडा लोळत होती. त्यानंतर ग्रामस्थांनी ही माहिती पशू वैद्यकीय अधिकारी यशवंते यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन तिच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी म्हशीला वैद्यकीय दवाखान्यात दाखल केलं. तर मृत युवका सोबत असलेल्या संकेत गवाणकरला तात्काळ जैतापूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ही घटना सायंकाळी ७ वा. च्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.