राई-रायकरवाडी येथील वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील राई-रायकरवाडी येथील वृद्धाने आंब्याच्या बागेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवीदास रत्नू रायकर (६०, रा. राई-रायकरवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना २४ डिसेंबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रायकरवाडी येथील धर्माजी रायकर यांच्या आंब्याच्या बागेत निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २४ डिसेंबरला देवीदास रायकर हे मंदिरात जातो असे सांगून निघून गेले होते. परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेऊन ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. त्यानंतर शोध घेतला असता धर्माजी रायकर यांच्या धार या ठिकाणी आंब्याच्या बागेतील झाडाच्या फांदीला नायलॉनची दोरी बाधून गळफास घेऊन देवीदास रायकर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.