Tuesday, July 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी स्टेट बँक कॉलनीत विद्युत वाहिनीवर माड कोसळला

रत्नागिरी स्टेट बँक कॉलनीत विद्युत वाहिनीवर माड कोसळला

सुदैवाने जीवितहानी टळली

रत्नागिरी:- शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात रविवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा आणि पावसामुळे श्री. संकेत चाळके यांच्या आवारातील माड तुटून विद्युत तारा व केबलच्या वायरमध्ये अडकला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर भाजपाचे उपाध्यक्ष शैलेश बेर्डे, उपाध्यक्ष नितीन गांगण, जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ. सायली बेर्डे तसेच स्थानिक नगरसेवक श्री. केतन शेट्ये यांनी तातडीने महावितरण व रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.

यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून माड हटविण्याचे काम हाती घेतले आणि विद्युत पुरवठा पूर्ववत केला. संबंधित यंत्रणांच्या तत्पर कार्यवाहीमुळे संभाव्य धोका टळल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.