Saturday, August 1, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्‍यू

रत्नागिरी शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्‍यू

रत्‍नागिरी:- तालुक्यातील शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना गुरुवार 30 जुलै रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास उघडकीस आली.

राजेश दिनकर किर (40,रा.रनपार किरवठार, रत्‍नागिरी) असे बुडून मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्‍यांचा चुलत भाउ नितीन पुरुषोत्तम किर याने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्‍यानुसार, गुरुवारी सायंकाळी 3.30 वा.सुमारास ते घरी असताना त्‍यांच्या वाडीतील जयवंत किर यांनी घरी येउन त्‍यांचा चुलत भाउ राजेश किर हा शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडाला असल्याची माहिती दिली. नितीन किर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्‍यांना त्‍याठिकाणी गावातील लोक राजेशला दोरी आणि काठीने बाहेर काढण्याचा प्रयत्‍न करत असल्याचे दिसून आले. परंतू पाणी खोल असल्याने राजेशला बाहेर काढण्यात अडचणी निर्माण होत होत्‍या. अखेर फिनोलेक्स कंपनीचे फायर फायटर विभागाचे अनिल सुर्वे यांनी बोया,दोरी व गळ यांच्या सहाय्याने सायंकाळी 5 वा. राजेशला डोहातून बाहेर काढले. तो बेशूध्द अवस्थेत दिसून आल्याने त्‍याला तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्‍याला तपासून मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.