रत्नागिरी:- शहरातील आठवडाबाजार व साळवीस्टॉप जलतरण तलाव येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद खॉजा रिफाई (वय ३२, रा. कोकणनगर,मराठी शाळेजवळ, रत्नागिरी) व संतोष बजरंग शिंदे (वय २२, रा. स्टेट बॅंक कॉलनी साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. १५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष भालेकर व शरद कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









