रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा ते कुवारबाव जाणाऱ्या रस्त्यावर आणि एमआयडीसी येथील जी.एफ कंपनी ते एफ.सी.आय गोडावूनकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांना अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने वाहने उभी केली. याप्रकरणी तीन चालकांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 11.45 ते 1.25 वा. कालावधीत करण्यात आली.
अमोल बाळकृष्ण सागवेकर (46,रा.सोनारवाडी हातखंबा, रत्नागिरी), सलिम पैगंबर मुल्ला (30,रा.गुलाबवाटिका रविंद्रनगर कारवांचीवाडी, रत्नगिरी) आणि अमोल दत्ताराम खोसरे (36, रा. हनुमाननगर मिरजोळे,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशतिय चालकांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल गणपत झोरे, पोलिस काँस्टेबल आशिष रहाटे प्रविण पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी यातील अमोल सागवेकर याने आपल्या ताब्यातील कार (एमएच-08-बीई-9419),सलिम मुल्लाने आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच-08-एपी-8001) तर अमोल खोसरे याने आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-43-यु-5584) इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण करेल अशा पध्दतीने उभा केला होता. तीन्ही चालकांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









