रत्नागिरी तालुक्यात आणखी 11 पॉझिटिव्ह रुग्ण; जिल्ह्यात 27, एकूण रुग्णसंख्या 1 हजार 336 

रत्नागिरी:- सोमवारी रात्री 20 रुग्ण सापडल्यानंतर मंगळवारी रत्नागिरी तालुक्यात आणखी 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर जिल्ह्यात एकूण 27 नवे रुग्ण सापडले असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1 हजार 336 वर पोचली आहे. 

मंगळवारी रात्री  प्राप्त  242 अहवालांपैकी एकूण 24 पॉझिटीव्ह. याव्यतिरिक्त घरडा केमिकल्स मधील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे सायंकाळी प्राप्त एकूण पॉझिटिव्ह अहवाल 27 झाले आहेत.  

नव्याने आलेल्या अहवालात रत्नागिरीतील 11, कामथे  8, दापोली 4, गुहागर  1 आणि घरडा येथील  3 रुग्ण आहेत.