रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार मध्यवर्ती बसस्थानकासमोर वाहतूकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या दोन संशयित वाहन चालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप रमेश राठोड (वय ३४, रा. भगवती बंदर किल्ला, रत्नागिरी) वविशाल रामचंद्र सावंत (वय ३५, रा. मांडवी, रत्नागिरी) असे संशयित चालकांची नावे आहेत. या घटना सोमवारी (ता. ५) रात्री सव्वा आठच्या सुमारास निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालकांनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहन लावून वाहतूकीस व रहदारिस अडथळ निर्माण केला. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल ईशिता वाडावे व अमिता पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित दोन वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









