उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन
रत्नागिरी:- रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील १८ ते २९ वयोगटातील तरुणांचे लसीकरण कॅम्प शुभारंभ दिनांक २० ऑगस्ट रोजी मा. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्य शुभहस्ते संपन्न होणार आहे. कोविडच्या या संकटामध्ये उदय सामंत यांनी आपल्या मतदार संघातील १८ ते २९ वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फायदा तरुण वर्गाला होत आहे.
दि. ७ जुलै ते ९ जुलै २०२१ या कालावधीमध्ये रत्नागिरी शहरातील ६५७२ तरुणांचे लसीकरण झाले होते. हा कॅम्प यशस्वीपणे संपन्न झाल्यावर ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदार संघातील ग्रामीण भागातील १५००० तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. ना. उदय सामंत यांनी शब्द दिल्या प्रमाणे लसीकरण कॅम्प शुभारंभ दि. २० ऑगस्ट रोजी हातखंबा जिल्हा परिषद गटामधील पाली येथील डी. जे. सामंत महाविद्यालय तसेच हातखंबा येथील सिध्दीगिरी मंगल कार्यालय येथून सकाळी ९.०० वाजता सुरूवात होणार आहे.
दि. २० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ या ११ दिवसाच्या कालावधीमध्ये या लसीकरण कॅम्पचे नियोजन खालील प्रमाणे करण्यात आलेले आहे. सर्व कॅम्प सकाळी ९.०० वाजता सुरु होणार आहेत.
दि. २० ऑगस्ट रोजी हातखंबा जिल्हा परिषद गट –
हातखंबा पंचायत समिती गण – सिध्दीगिरी मंगल कार्यालय हातखंबा तिठा
पाली पंचायत समिती गण – डी. जे. सामंत महाविद्यालय पाली
दि. २१ ऑगस्ट २०२१ रोजी करबुडे जिल्हा परिषद गट –
करबुडे पंचायत समिती गण – करबुडे हायस्कूल देऊड पंचायत समिती गण –
बाबाराम कदम,ज्युनिअर कॉलेज
जाकादेवी
दि. २३ ऑगस्ट २०२१ रोजी नाचणे जिल्हा परिषद गट –
कुवारबांव पंचायत समिती गण – जि. प. शाळा कुवारबांव, ग्रामपंचायत कुवारबांव समोर
नाचणे पंचायत समिती गण – बालाजी मंगल कार्यालय, शांती नगर नाचणे
दि. २४ ऑगस्ट २०२१ रोजी हरचिरी जिल्हा परिषद गट –
कर्ला पंचायत समिती गण – टेंभ्ये हातिस ग्रामपंचायत
हरचिरी पंचायत समिती गण – चिंद्रवली ग्रामपंचायत
दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी पावस जिल्हा परिषद गट –
पावस पंचायत समिती गण – विद्यामंदिर पावस
गावखडी पंचायत समिती गण – सरस्वती विद्यामंदिर, गावखडी
दि. २६ ऑगस्ट २०२१ रोजी गोळप जिल्हा परिषद गट –
गोळप पंचायत समिती गण – ग्रामपंचायत गोळप हॉल
फणसोप पंचायत समिती गण – लक्ष्मीकेशव विद्यामंदिर फणसोप
दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी शिरगाव जिल्हा परिषद गट –
शिरगाव पंचायत समिती गण – जाकीमिऱ्या ग्रामपंचायत हॉल
कासारवेली पंचायत समिती गण – ओंकार मंगल कार्यालय बांदखिंड, शिरगाव
दि. २८ ऑगस्ट २०२१ रोजी कोतवडे जिल्हा परिषद गट –
कोतवडे पंचायत समिती गण – घैसास हॉल कोतवडे
मालगुंड पंचायत समिती गण – महालक्ष्मी हॉल गणपतीपुळे
दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी वाटद जिल्हा परिषद गट –
वाटद पंचायत समिती गण – सर्वसाक्षी हॉल, वाटद
वरवडे पंचायत समिती गण – बापू जोशी हॉल, वरवडे
दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी नावडी जिल्हा परिषद गट –
नावडी पंचायत समिती गण – कोळंबे ग्रामपंचायत
फुणगुस पंचायत समिती गण – कोंडये ग्रामदेवता मंदिर
दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी मिरजोळे जिल्हा परिषद गट –
मिरजोळे पंचायत समिती गण – मिरजोळे ग्रामपंचायत हॉल
फणसवळे पंचायत समिती गण – फणसवळे ग्रामपंचायत हॉल
मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने आणि शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका प्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हा प्रमुख बाबु म्हाप तसेच युवासेना रत्नागिरी तालुका व शहर पदाधिकारी तसेच शिवसेना जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तसेच शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी मेहनत घेत आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना कोविड आजावरील ही लस शिवसेनेच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.









