रत्नागिरीतील मच्छिमार्केट येथे स्कोडा कारला आग

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मच्छीमार्केट येथे स्कोडा कारला अचानक आग लागली. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आग लागलेली चारचाकी गाडी एका इमारतीच्या बाहेर उभी करून ठेवण्यात आली होती. सकाळच्या सुमारास गाडीने पेट घेतला. गाडीला आग लागली त्यावेळी गाडीत कोणी नसल्याने जीवितहानी झाली नसली तरी गाडी पूर्णतः जळून खाक झाली. नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. स्कोडा कारला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.