रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवार दि. ९ मार्च रोजी दापोली दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार असून सायंकाळी शिवसेना पक्षाचा मेळावा देखील होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 1.40 वाजता हर्णे बंदर येथील हेलिपॅड, ता. दापोली, जि. रत्नागिरी आगमन होईल. यानंतर मोटारीने हर्णे बंदरकडे प्रयाण करतील. दुपारी 1.45 वाजता हर्णे बंदर – जेटी भूमीपूजन, दुपारी 2.00 वाजता मोटारीने हर्णे बंदर हेलिपॅडकडे प्रयाण करतील. दुपारी 2.05 वाजता हर्णे बंदर हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने दापोली, हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.25 वाजता, दापोली हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने दापोलीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता दापोली मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमीपूजन, लोकार्पण व उद्द्घाटन कार्यक्रम होतील दुपारी 3.00 वाजता मोटारीने आझाद मैदानाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता शिवसेना पक्षाचा मेळावा व सागरी किनारा मार्गातील केळशी येथील पुलाचे भूमीपूजन (ऑनलाईन), सायंकाळी 4.00 वाजता मोटारीने दापोली हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 4.15 वाजता दापोली हेलिकॉप्टरने राजभवन हेलिपॅड मुंबईकडे रवाना होतील.









