रत्नागिरी:- ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना ठोकर दिली. हातखंबा येथील दर्ग्याजवळ शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सहाजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून घटनस्थळी मदतकार्य सुरू आहे.
मालवाहू ट्रकचे ब्रेक हातखंबा दर्ग्याच्या उतारात फेल झाले. ब्रेक फेल झालेल्या ट्रकने समोरील चार वाहनांना उडवले. त्यातील दोन वाहने दर्ग्या समोरच्या दरीत कोसळली आहेत. दोन वाहने रस्त्यालगत पडली आहेत. अपघातामध्ये सहाजण जखमी झाल्याचे समजते. घटनस्थळी पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.