रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली आहे. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिरजोळे – पाटीलवाडी येथे आज सकाळी आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत एक तरुण आढळला. या तरुणाची ओळख पटली असून, हा तरुण जयगड येथील आंग्रे पोर्टमध्ये फायर फायटर म्हणून कामाला असल्याची माहिती समोर येत आहे. तो आपली ड्युटी संपवून सकाळी जात होता. मात्र, त्यानंतर तो पाटीलवाडी येथे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या ठिकाणी एक दुचाकी आंब्याच्या झाडाखाली एका बाजूला लावलेल्या अवस्थेत आढळली. ही गाडी शिवाजी नगर येथील एका व्यक्तिच्या नावावर आहे. तेथीलच आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत तरुण सापडला आहे. या तरुणाच्या अंगावर कंपनीचा ड्रेस आहे.









