मालमत्तेची मोजणी आता ड्रोनच्या सहाय्याने; प्रक्रिया होणार गतिमान

रत्नागिरी:- मिळकत प्रपत्र (प्रॉपर्टी कार्ड) देण्यासाठी आणि ड्रोनच्या सहाय्याने मालमत्तेची मोजणी करण्यात येणार आहे. यामुळे वेळखाऊ प्रक्रियेला आळा बसणार् असून मालमत्तेचा व्यवहाराचे निर्णय त्वरित मार्गी लागणारआ हेत. या  पध्दतीने 10 कि. मी. परिघातील मालमत्तेचेही विवरण एकाचवेळी निश्चित करता येणार आहेत. तंत्रज्ञानाचा एकत्रितरित्या वापर केल्यानंतर मोजणीचा कालवधी, त्यातील अचूकता यामुळे ग्रामीण भागातील मालमत्ता मोजणीचे काम जलदगतीने  होणार आहे.

ज्या शहरात अथवा गावात  सर्व्हेचे काम झाले आहे, परंतु अशाठिकाणी  मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्हीही सुरू आहेत. अथवा, सिटी सर्व्हे झाले असूनही सातबारा उतारा सुरू आहे. त्यामुळे अशा जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोईनुसार सातबारा उतार्‍यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत.  त्यासाठी भूमि अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे.