मांडवी येथे दुचाकीच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या वृद्धाचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दिपक जगन्नाथ शिवलकर (वय ६०, रा. भैरी मंदिर जवळ, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास मांडवी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिपक शिवलकर हे दुचाकी घेऊन मांडवी ते मिरकरवाडा असे जात असताना अपघात झाला. या अपघातमध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्यात अपघाताची खबर देण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.