Wednesday, May 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी मांडवी येथील तरुणाचा भगवती किल्ल्याजवळ आढळला मृतदेह

मांडवी येथील तरुणाचा भगवती किल्ल्याजवळ आढळला मृतदेह

रत्नागिरी:- तीन दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अमोल संजय किड्ये (वय ३०, रा. मांडवी, रत्नागिरी) असे समुद्र किनारी मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.९) सायंकाळी चारच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल किड्ये हा तीन दिवसांपासून आपल्या राहत्या घरातून निघून गेला होता. त्यानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह भगवती किल्या जवळ येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी रेलिंगच्या बाहेरिल बाजूस समुद्र किनारी नागरिकांना आढळला.तसेच अमोल ची गाडी तशीच असून गाडीला चावी ही लावलेली होती.स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह समुद्रातून बाहेर रोपवेच्या आधारे काढला.उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.