रत्नागिरी:- मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्र मंडळ जयगड खंडाळा यांच्यावतीने आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेत साईबाबा संघ विजेता ठरला. तर जय भैरी चाफेरी संघ उपविजेता ठरला. दोन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेला प्रेक्षकांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. २९ आणि ३० जुलै रोजी खंडाळा हायस्कूलच्या मागील मैदानावर या पावसाळी रबर बॉल सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ३० संघानी आपला सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेचे उद्घाटन खंडाळा महावितरणचे अधिकारी श्री. साईराज नागवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिष भालेकर आणि उपाध्यक्ष श्री. दिपक चौघुले उपस्थित होते. या स्पर्धेदरम्यान रत्नागिरी महावितरणचे उपविभागीय अधिकारी श्री. संजय तांबे यांनी आवर्जून भेट दिली.
स्पर्धेचा अंतिम सामना साईबाबा कचरे विरुद्ध जय भैरी चाफै या संघादरम्यान संपन्न झाला. या अंतिम सामन्यात साईबाबा कचरे संघ विजेता ठरला तर जय भैरी चाफे संघ उपविजेता ठरला. मंडळाच्यावतीने विजेत्या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून तेजस हळदणकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून समीर मांडवकर तर षटकारांचा बादशाह म्हणून अमोल पवार यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री. आशिषजी भालेकर, उपाध्यक्ष श्री. दिपकशेठ चौघुले, अनिकेत सुर्वे, आदेश पावरी, मंदार घाटगे, बिपीन विचारे, विराज कोवळे, रणजित जाधव, माधव अंकलगे उपस्थित होते. स्पर्धा पंच म्हणून अमोल पवार, प्रतिक उर्फ पिंट्या जाधव, राज देवरुखकर, कौस्तुभ बिवलकर, तुषार पोमेंडकर, साई किंजळे यांनी काम पाहिले. तर स्पर्धेचे नियोजन, धावते समालोचन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य श्री. एस्. के जाधव सर यांनी उत्तमरित्या केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य महेश भालेकर, हर्षद महाकाळ, संदीप कश्यप, चेतन सकपाळ, ऋग्वेद विचारे, महेश विचारे, भाऊ शिवगण यांनी उत्तम सहकार्य केले. वाटद गावचे पोलीस पाटील श्री. सुधाकर शिर्के, दिग्विजय इंगळे, सर्व जमीन मालक तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी हस्ते परहस्ते मदत केली त्या सर्वांचे मंडळाकडून विशेष आभार मानण्यात आले.









