रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील मद्यपी खलाशी समुद्राच्या पाण्यात पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दुखराम भागी राजी (वय ४३, रा. मिरकरवाडा जेटी, मुळः भजनीनकर, पालिका, जि. कैलाली नेपाळ) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खलाशी दुखराम राजी याला मद्यपानाचे व्यसन होते. शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मिरकरवाडा जेटी येथील खबरदेणार यांच्या सफवान अल हमिदा या बोटीच्या बाजूला समुद्राच्या पाण्यात पडलेल्या स्थितीत सापडला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









