मत्स्य विभागातील परवाना अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्याला लागून असणाऱ्या सागरी किनाऱ्यावर सुमारे ६०० नौका कोणताही परवाना नसताना खुलेआम बेकायदा मासेमारी करीत आहेत. त्याच्याकडे मत्सविभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पारंपारिक मच्छिमारांनी केला होता. या बेकायदेशीर मासेमारीकडे डोळेझाक करणाऱ्या एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाई बाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली. परवाना देण्याचे काम करत असताना कामातील हलगर्जीपणा या अधिकाऱ्याला भोवल्याची चर्चा आहे.