रत्नागिरी:- शहरातील राजिवडा येथील पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या खलाशाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंकर बकोरी यादव (वय २०, रा. राजिवडा मुळ ः झारखंड) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २०) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत शंकर यादव याने सकाळी साडेअकराच्या सुमारास बोट मालक महमद हनीफ दाऊद बुड्ये (रा. राजीवडा) यांना गावाला जातो म्हणून सांगून गेला होता. तो सायंकाळी राजिवडा पुल येथे बेशुद्ध अवस्थेत बोट मालकांना दिसला त्यांनी पोलिसांनी खबर दिली पोलिस व मालक यांनी खासगी रुग्णवाहिने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तपासात सहाय्यक पोलिस फौजदार यांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









