बाजारपेठेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतीच; पाचव्या दिवशी सापडले 8 रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरी बाजारपेठेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतीच आहे. चार दिवसात 37 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असताना पाचव्या दिवशी नव्याने आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आता पर्यंत बाजारपेठत 45 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही काहीशी चिंतेची बाब ठरत आहे. 

पहिल्याच दिवशी 75 जणांची तपासणी करण्यात आली यातून बाजारपेठेत तब्बल 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. दुसऱ्या दिवशी 31 जणांपैकी 8, तिसऱ्या दिवशी 60 पैकी तब्बल 12 तर 6 सप्टेंबर ला 60 तपासण्या करण्यात आल्या. यातील 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. चार दिवसात 226 जणांची तपासणी करण्यात आली असून यातील 37 जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 
 

तर पाचव्या दिवशी तपासणीत 43 जणांची तपासणी करण्यात आली यात आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे बाजारपेठेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 45 झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरातील बाजारपेठ कोरोनाची चैन तोडण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असताना रत्नागिरीत व्यापाऱ्यांनी मात्र बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.