रत्नागिरी:- बँकेव्दारे ताब्यात घेण्यात आलेल्या मिळकतीमध्ये बेकायदेशिरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हंबीरराव सावळा गोसावी, सविता हंबीरराव गोसावी (दोन्ही रा.निवळी रावणंगवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर रविकुमार लोहकरे (40, रा.हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन्ही संशयितांची मिळकत मंडळ अधिकारी तरवळ यांनी सिलबंद करुन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खेडशी यांच्या ताब्यात दिली होती. त्या मिळकतीचे सिल तोडून संशयितांनी बेकायदेशिरपणे त्यात अतिक्रमण करत वास्तव्य केले आहे.