कोळंबे येथील घटना
रत्नागिरी:- मोबाईलवर सोशल मिडियाच्या फेसबुकवर रिल बघत घरी चालत जात असताना मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये तरुण जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुशिल सुनिल रहाटे (वय ३५, रा. कोळंबे, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास फिनोलेक्स फाटा ते कोळंबे गाव रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशिल रहाटे यांचे फिनोलेक्स फाटा येथे गॅरेज आहे. गॅरेजमधील काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास ते चालत आपल्या कोळंबे गावी जात होते. चालताना मोबाईलवरिल रिल बघत असताना त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. हातातील मोबाईल खाली पडला. मात्र त्यांच्या बोटांना जखमी झाल्या आहेत. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.









