पोलसहीत पडल्याने गुहागर येथे वायरमनचा मृत्यू

रत्नागिरी:- विद्युत वाहिनीवरील पोलवर वायरिंगचे काम करण्यासाठी चढलेल्या वायरमनचा पोलसहीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना  22 फेब्रुवारी रोजी घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत बाळकृष्ण उत्तेकर (35, चिखली, गुहागर) हे वीजेच्या पोलवर वायरिंगचे काम करण्यासाठी चढले होते. यावेळी पोल तुटल्याने पोलासहीत ते खाली जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने मुंबई येथील के.ई.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद मंगेश बाळकृष्ण उत्तेकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात दिली.