पाली-कशेळी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-कशेळी येथील वृद्धाला ताप आल्याने उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मंगेश गंगाराम किनरे (वय ६०, रा. पाली-कशेळी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) सकाळी पाचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश किनरे यांना ताप आल्याने उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.