लांजा:- तालुक्यातील वनगुळे येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय रंजना रघुनाथ गरथ यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना २० एप्रिल २०२५ रोजी घडली. याबाबतची माहिती १७ मे २०२५ रोजी लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रंजना गरथ आणि त्यांचे पती यांच्यात १८ एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास भांडण झाले होते. रागाच्या भरात रंजना यांनी कोणालाही काही न सांगता घरात असलेले गवत मारण्याचे औषध पिले. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागल्याने १९ एप्रिल रोजी त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांच्या पतीने त्यांना रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४.४५ वाजता दाखल केले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.