नेवरे खाडीत बुडून प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे खाडीत बुडून प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. सुमारास उघडकीस आली. दिलीप सहदेव फणसे (42, रा.चिंचवणे नवेरे, रत्नागिरी) असे खाडीत बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

शनिवारी सायंकाळी नेवरे येथील खाडीच्या पाण्यात तेथील ग्रामस्थांना दिलीप फणसे हा बुडून मयत स्थितीत दिसून आला. याबाबत त्यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.