Thursday, May 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी नाणीज येथे गाडीचा टायर फुटून अपघात; पाच जण जखमी

नाणीज येथे गाडीचा टायर फुटून अपघात; पाच जण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज येथे चालत्या गाडीचा पुढील टायर फूटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. या गाडीतील पाच जण जखमी झाले. निलेश गुरुदास गवस (३६), गुरुदास आप्पा गवस, गितांजली गुरुदास गवस, नेहा निलेश गवस, सुकन्या निवेश गवस (सर्व रा.पिकुळ ता.दोडा मार्ग जि.सिंधुदुर्ग) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी चारच्या सुमारास नाणीज येथे घडली. याबाबत निलेश गवस यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

त्यानुसार, शुक्रवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील गाडी (एमएच-०७-एजी-७५९८) मधून आपल्या कुटंबासह असुर्डे गुरववाडी,संगमेश्वर येथे एका लग्नासाठी आले होते. सायंकाळी ते लग्न कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा पिकुळे सिंधुदुर्ग येथे कोल्हापूर मार्गे जात होते. नाणीज गावी आले असता त्यांच्या चालत्या गाडीचा पुढील टायर फुटला. त्यामुळे गाडी रस्त्याला असलेल्या दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये निलेश गवस यांच्या डोक्याला उजव्या बाजुला दुखापत झाली. तर त्यांचे वडील गुरुदास आप्पा यांच्या डोक्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, आई गितांजली गवस यांच्या पायाला व तोंडाला, पत्नी नेहा गवस यांच्या डाव्या पायाला आणि मुगली सुकन्या गवस हिला मुका मार लागला आहे. या अपघातात गाडीचेही नुकसान झाले असून याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार कांबळे करत आहेत.