नाणिज येथे रिक्षा उलटून तरुणी ठार तर तीनजण जखमी; रिक्षा चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील नाणिज इरमलवाडी येथे कोल्हापूर ते रत्नागिरी रोडवर गणपतीपुळेला देवदर्शनासाठी जाणारी रिक्षा पलटी होवून २३ वर्षीय विवाहिता व तीन जण जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वा . च्या सुमारास घडली होती . या अपघातात एकाच्या मृत्यूस व तिघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल भगवान आलदर ( ३० पढरपूर , सोलापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अनिल आदलकर हा आपल्या रिक्षातून तीन प्रवासी घेवून पंढरपूर ते गणपतीपुळे असा देवदर्शनासाठी घेवून जात होता . नाणीज येथील वळणावर इरमलवाडी येथे रिक्षा पलटी झाली होवून पुंडलिक अंकुशराव , पुनम अंकुशराव , रिध्देश आलदार असे तीन प्रवास जखमी झाले . शुभागी अनिल आलदार ( २३ ) ही रिक्षा चालकाची पत्नी असून तिचा या अपघातात मृत्यू झाला . या अपघाताची फिर्याद मोहन कांबळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली . त्यानुसार रिक्षा चालक अनिल आलदार याच्यावर भादविकलम ३०४ ( अ ) , २७ ९ ३३७ ३३८ , मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .