रत्नागिरी:- धूप व लाटांच्या तडाख्याने सागरी किनारपट्टी भागातील होणारे नुकसान टाळण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे उभारण्यात येत आहेत. पावसाळ्यापूर्वी हे बंधारे पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आता हे बंधारे ‘अॅॅक्शन मोड’मध्ये आहेत .
कोकणातील पाचही जिल्ह्यातील किनारी भागातील धूप बंधार्यांची कामे पावसाळ्या आधी पूर्णकरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात यामध्ये मांडवी, काळबादेवी, कसोप, सोमेश्वर, वरवडे, पोमेंडी, जुवे , गुहागर, दापोली या धूपप्रतिबंधक बंधार्यांचा समावेश आहे.
धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने किनारपट्टी भागात राहणार्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: पावसाळ्यात व भरतीच्या वेळी किनारपट्टी भागात उसळणार्या उधाणाच्या लाटा किनार्यावर आदळतात. याचा फटका किनार्यालगत असलेल्या मानवी वस्त्यांना बसतो. त्यातच बेसुमार वाळूउपसा, कचर्याची समस्या किनार्यालगत असलेली सुरूची झाडे भरतीच्या पाण्यामुळे नष्ट झाली आहेत. दुसरीकडे बंधारा नसल्याने पाणी थेट समुद्रकिनार्यावरील विविध भागांत घुसून किनार्यावरील घरे, शेती, बागायती यांचे मोठे नुकसान होते यासाठी या भागात धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मिर्या, पंधरामाड येथील बंधार्यांसाठी अनेकदा मानवी संघर्षही झाला आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये धोकादायक अशा किनार्यावर धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी प्रशासनांकडून 1400 कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या नुसार बंधार्यांची उभारणी पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना करताना प्रस्तावाल वित्त विभागाचीही मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, आता सीआरझेडच्या जाचक निर्बंधातूनही काही बंधारे मुक्त झाले आहेत. यामध्ये रत्नागिरीतील वरवडे, सोमेश्वर, जुवे, पोमेंडी येथील बंधार्यांचा समावेश आहे. मांडवी, काळबादेवी आणि कसोप या तीन बंधार्यांची कामेही मंजूर आहेत. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णकरण्यासाठी आता हे बंधारे ‘अॅॅक्शन मोड’मध्ये आहेत.









