संगमेश्वर:- देवरुख पांगरीमार्गे रत्नागिरी मार्गावर दोन दुचाकींची धडक होऊन वाशी कडूवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (२१ मार्च) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पूर फाटा येथील वळणावर घडला. अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव संदेश सुभाष कदम (४०) असे आहे.
संदेश कदम हे दुचाकी (एमएच ०८, बीए ५०२८) घेऊन देवरुखहून वाशीकडे चालले होते. यावेळी रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने येणारी दुचाकी (एमएच १०, बीएच ३५८१) वर संदेश कदम यांची दुचाकी आदळली. यामध्ये संदेश कदम हे जागीच मृत झाले. त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेले नरेंद्र गुणाजी पेंढारी (रा. वाशी) तसेच दुसऱ्या दुचाकीवरील सांगली येथील युवराज कलाप्पा खोत, अविनाश पांडू जाधव जखमी झाले आहेत.









