रत्नागिरी:- दुचाकीवरुन जातान चक्कर आलेली महिला दुचाकीवरुन उतरत असताना पडली. तिच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरु असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सुगंधा सुधाकर जोशी (वय ६९, रा. मुरुगवाडा, पालिका शाळेच्या शेजारी, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना १७ डिसेंबरला दुपारी पावणेतीनच्या सुमारास कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटल येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुगंधा जोशी या भावाचा मुलगा श्रीराज विनायक जोशी यांच्या दुचाकी (क्र. एमएच-०८ बीजे ३४७६) वरुन मुरुगवाडा ते आडी असे परटवणेमार्गे जात असताना सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास महर्षी कर्वे महिला विद्यालय रस्त्यावर सुगंधा यांना चक्कर आली. श्रीराज याने दुचाकी थांबवली मात्र तोपर्यत सुंगधा या पडल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. बेशुद्ध पडली. खासगी दवाखान्यात उपचार करुन जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









