Wednesday, July 22, 2026
spot_img
Home रत्नागिरी दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिप देण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक

दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिप देण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिप घेण्याकरिता गुगल अप्लीकेशनवर फिर्यादींनी सर्च केले. अज्ञातांनी पेट्रोल पंप मंजूर झाल्याचे सांगून ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तालुक्यातील पाली येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मनोहर शंकर मेलगे (रा. गवंडेवाडी, खानू-पाली, संदिप लक्ष्मण सावंत यांच्याकडे भाड्याने मुळ ः बेळगाव) यांनी दिव्यांग पेट्रोलपंप डिलर शिप घेण्याकरता गुगल अॅप्लीकेशनवर सर्च केले. त्यांना काही दिवसांनी दोन मोबाईल नंबर वरुन दोन अनोळखी व्यक्तींनी ते बीबीसीएल मुंबईचे प्रतिनिधी असल्याचे भासवून पेट्रोल पंप मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर संशयितांनी पेट्रोलपंपाचे इनव्हास, डिलरशिप लायसन्स, एनओसी व पेट्रोलफ्यूअल टॅंक इत्यादी पुर्ण करण्याच्या प्रोसिजर करिता फिर्यादी यांना वेगवेगळ्या बॅंक खात्यामध्ये वेळोवेळी एनईएफटी व आरटीजीएस द्वारे रक्कम भरणा करण्यास सांगितले त्या प्रमाणे एप्रिल २०२४ ते एप्रिल २०२५ या कालवधीत फिर्यादी यांनी ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची भरणा केली. त्यानंतर फिर्यादी यांनी पेट्रोलपंप डिलरशीप बाबत त्यांना आलेल्या मोबाईल नंबर पंपाचे काम कधी पर्यत चालू होईल या करिता संपर्क साधला असता त्यांचे मोबाईल नंबर बंद असल्याने फिर्यादी यांनी बीपीसीएल मुंबई यांचा नेटवरुन संपर्क क्रमांक घेवून संपर्क केला असता. बीपीएसएल कंपनीकडून असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आले. मनोहर मेलगे यांची आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात दोन मोबाईल नंबर धारकांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.