रत्नागिरी:- पश्चिम महाराष्ट्राला कोकणला जोडणार्या राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाटात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्याने दरड कोसळली आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
सध्या कोकण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गतवर्षी आंबा घाट बंद पडल्यानंतर या मार्गावरून कोल्हापूरकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती मात्र त्यानंतर या घाटात सुधारणा करण्याचे कोणतेही काम झाले नव्हते. गुरुवारी पहाटे दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक विभागाकडून मार्ग सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले होते, ९.३० वाजता दरड हटवून वाहतूक नियमित करण्यात आली आहे.