रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस -अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील रस्त्यावर इलेक्ट्रीक पोलला दुचाकीस्वाराने ठोकर दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. गंभीर जखमी स्वाराला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नदीप रणजित खेतले (वय २४, रा. निवखोल, रत्नागिरी) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास थिबापॅलेस येथील अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील रस्त्यावरील पोल जवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नदीप खेतले व त्यांच्या सोबत त्याचा मित्र रुद्र थुळ असे दोघे दुचाकीने मंगळवारी निवखोल येथून थिबापॅलेस ते गगनगिरी मठ-विश्वनगर रस्त्यावरुन जात असताना रत्नदीप यांचा दुचाकीवरिल ताबा सुटून दुचाकी इलेक्ट्रीक पोलला आदळली. या अपघातात रत्नदिप गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मार लागला तर मागे बसलेला रुद्र थुळ हा किरकोळ जखमी झाला. रत्नदिप याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.









