Wednesday, May 27, 2026
spot_img
Home राजापूर ताम्हाणेत दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

ताम्हाणेत दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील ताम्हाणे बनाचा माळ येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात सिद्धेश शिवाजी भोस्तेकर (२९, रा. माणगाव, रायगड, सध्या रा. सांताक्रुज, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ताम्हाणे रोडवर हा अपघात घडला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्देश भोस्तेकर हे माणगाव येथून दुचाकीवरून ताम्हाणे येथील आपल्या सासुरवाडीला येत होते. ताम्हाणे रोडवरील बनाचा माळ परिसरात दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुधीर उबाळे करत आहेत.

दुचाकी समोरील चिरेबंदी कंपाऊंडच्या भिंतीवर जोरात आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच राजापूर पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक सुधीर उबाळे तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अपघाताची